जिल्हा

१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे बक्षीस

१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे बक्षीस
१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे बक्षीस फोटो: ठाणे वैभव

संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार बक्षिसांची लयलूट

ठाणे : सालाबादप्रमाणे यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मागील वर्षी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावून विश्वविक्रम रचला आणि पुन्हा एकदा संस्कृतीच्या दहीहंडीला विश्वविक्रमी दहीहंडीचा मान मिळाला. 

यंदाही विविध गोविंदा पथकांमध्ये संस्कृतीची दहीहंडी फोडण्यासाठी उत्साहपूर्ण आणि चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. उत्सवाच्या आयोजनात उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या सर्व नियम व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून, प्रत्येक सहभागी गोविंदाची सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे पारितोषिक व ट्रॉफी, ठाणे शहरातील नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच लाख व ट्रॉफी, ठाणे शहराबाहेरील नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास        दोन लाख व ट्रॉफी, आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार रुपये पारितोषिक व ट्रॉफी, सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार रुपये पारितोषिक व सन्मानचिन्ह, सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार रुपये पारितोषिक व सन्मानचिन्ह, पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच हजार रुपये पारितोषिक व सन्मानचिन्ह अशी बक्षीसे देण्यात येतील. तसेच महिला गोविंदा पथकाला विशेष पारितोषिक देण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले. 

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य दहीहंडी उत्सवात जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी भाग घ्यावा तसेच नागरिकांनी सालाबादप्रमाणे यंदाही आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आपल्या सहभागाने गोविंदांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475